परभणी : शहरातील सुपर मार्केट परिसरातील नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या भिंतीला लागून एका भरधाव कार चालकाने दुचाकीला उडवल्याची घटना घडली आहे. यात दोन्ही शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ज्ञानेश्वर त्रिंबकराव लोंढे, दिगंबर गुट्टे असं मयत शिक्षकांचे नाव आहेत.

परभणी शहरातील लोकमान्य नगर येथे राहणारे दोन शिक्षक एमएच २२ एआर ७१९४ क्रमांकाच्या दुचाकीवर सुपर मार्केटकडून राजगोपालाचारी उद्यानाकडे जात होते. तर कार चालक एमएच २४ एएफ ३०९६ क्रमाकांच्या कारने भरधाव वेगाने चालवत सुपरमार्केटकडे जात होता. चालकाचा ताबा कारवरून सुटल्याने आणि वेगाने गाडी चालवल्याने दुचाकीवर येणाऱ्या दोन शिक्षकांना जोरदार धडक दिली. दुचाकी एका पोलवर जाऊन आदळली. या घटनेत दुचाकीचा समोरचा भाग संपूर्ण दाबला गेला. अपघाताची तीव्रता एवढी होती की, दुचाकीवरील दोन्ही शिक्षक गंभीर जखमी झाले. एकाच्या डोक्याला जबर मार लागला. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला. जखमी असलेल्या एका शिक्षकाला स्पंदन हॉस्पीटल तर एकाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

शिवसैनिकांवर हल्ला, उद्धव ठाकरे भडकले, पोलिसांना झापलं, एकनाथ शिंदेंवरही निशाणा
दरम्यान, एका शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्राने दिली. तर दुसऱ्या शिक्षकाला खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. त्या शिक्षकाचा देखील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही शिक्षकांचे नाव ज्ञानेश्वर त्रिंबकराव लोंढे, दिगंबर गुट्टे असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर कार चालकाने नवा मोंढा पोलीस ठाण्यात शरण घेतली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांनी धाव घेऊन पाहणी केली.

रावसाहेब दानवेंच्या लेकाचं पवारांशी गुफ्तगू, फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, मला प्रेरणा मिळाली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here