दिल्लीच्या जाफराबाद परिसरात असलेल्या एका घरात ४ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. पतीनं पत्नी आणि दोन मुलींची गोळ्या झाडून हत्या करून मग स्वत:ला संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

आपल्याच कुटुंबातील सदस्यांवर, नातेवाईकांवर हल्ले केल्याच्या घटना याआधी दिल्लीत घडल्या आहेत. आता जाफराबादमधील घटनेमुळे दिल्लीत खळबळ माजली आहे. इसरारनं कोणत्या कारणांमुळे पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली ते स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपास प्राथमिक टप्प्यात असल्यानं पोलीस फारशी माहिती देणं टाळत आहेत.
गेल्या दोन दिवसांत दिल्लीत गुन्हेगारीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. गुरुवारी मॉडर्न गढी परिसरात एका सरकारी शाळेत चाकूहल्ल्याची घटना घडली. मधल्या सुट्टीत मोहित नावाच्या विद्यार्थ्याचा त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत वाद झाला. दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर मोहितनं त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तीन विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network