मुंबई: भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी एवढीच ओळख न ठेवता बँक मॅनेजमेंट ते गायन क्षेत्र… सोशल मीडिया ऍक्टिविस्ट ते रेड कार्पेटवर वॉक.. अनेक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवताना दिसत आहे. अमृता फडणवीस पुन्हा एकदा चाहत्यांसाठी सप्राइज घेऊन येत आहेत. त्यांचं आणखी एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या या आगामी गाण्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
अमृता यांनी ट्वीट करत याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटकरत या गाण्याचं पोस्टर शेअर केलं आहे. ‘लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना. लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना’ थँक यू सारेगामा ग्लोबल , कमिंग अप! असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे.
अमृता यांच्या या नवीन गाण्याची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक अल्बमसाठी गायन केलं आहे. हे सर्व अल्बम हिट ठरले आहेत. अमृता फडणवीस यांनी याआधीही वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात प्रामुख्यानं त्या गायिका म्हणून पुढं आल्या होत्या. महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता यांच्या गाण्याचा अल्बमही यापूर्वी प्रदर्शित झाला आहे.