मुसळधार पाऊस सुरू असताना असे असताना गरोदर मातेला वेळेत उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिका चालक वसंत गुरोडा यांनी रस्त्याचा आणि पाण्याचा योग्य अंदाज घेत गावाचा संपर्क तुटण्याआधीच रुग्णवाहिका पाण्यातून बाहेर काढत गरोदर मातेला रुग्णालयात पोहचवलं. वेळेत रुग्णालयात पोहचल्याने त्या मातेचा जीव वाचला असून रुग्णवाहिका चालक वसंत गुरोडा यांच्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या आठवडा भरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वैतरणा नदीला पूर आल्याने बहाडोली नदीपात्रात मुंबई – वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम करणारे १० कामगार बार्जवर अडकले होते. एनडीआरएफच्या मदतीने या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.