पन्हाळा येथील योगेश चंद्रकांत सणगर (वय २७) या युवकाचा बोहल्यावर चढण्याआधीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज मृत्यू झाला. त्याचे येत्या शुक्रवारी लग्न होते. त्याच्या लहान भावाचे आठ महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने तर वडिलांचे दीड वर्षांपूर्वा कॅन्सरने निधन झाले होते.

योगेशचा लहान भाऊ निलेश सणगर हा इंजिनिअर होता. त्याचाही आठ महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तर वडील चंद्रकांत सणगर हे शासकीय आयटीआय सेवेत होते. त्यांचे दीड वर्षांपूर्वी पूर्वी कॅन्सरने निधन झाले होते. वडिलांपाठोपाठ लहान भावाचे निधन झाल्याने योगेशवर घरची सर्व जबाबदारी पडली होती. पुढच्या आठवड्यात योगेशचे लग्न होते. पण बोहल्यावर चढण्याआधीच त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दीड वर्षात अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने माले आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. योगेशच्या पश्चात आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network