Aurangabad Crime News : औरंगाबादेत तंत्र विद्येचा वापर करून पैशांचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत भोंदू मांत्रिकांच्या टोळीने शहरातील व्यापाऱ्यासह तिघांची तब्बल साडे अकरा लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेशाखेच्या पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकून टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या.

 

Aurangabad Crime News 11 lakhs to the businessmen by showing the lure of raining money to the accused magicians (1)
पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत व्यावसायिकांना ११ लाखांचा गंडा, मांत्रिकांना बेड्या

हायलाइट्स:

  • पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून अकरा लाखांचा गंडा
  • औरंगाबदमधील धक्कादायक घटना
  • भोंदू मांत्रिकांची टोळी गजाआड
औरंगाबाद : तंत्र विद्येचा वापर करून पैशांचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत भोंदू मांत्रिकांच्या टोळीने शहरातील व्यापाऱ्यासह तिघांची तब्बल साडे अकरा लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेशाखेच्या पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकून टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कैलास रामदास साळुंके (वय २५) (रा.वाळूज, जि.औरंगाबाद) असं मांत्रिकांचे नाव आहे. तर प्रमोद दीपक कांबळे (वय ३१) (रा.बौद्धनगर, जवाहर कॉलोनी), गोरख साहेबराव पवार (रा.शिर्डी, जि.अहमदनगर) अशी दोन साथीदारांची नाव आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील व्यापारी जावेद खान नूर खान (वय ५०) (रा.प्रिया कॉलोनी, औरंगाबाद) पुष्पा उर्फ रत्नदीप गाडेकर (रा.गोवा) आणि शोधन निपाणीकर हे तिघेही एकमेकांचे ओळखीचे असून मांत्रिकाने या तिघांना विश्वासात घेत पैशांचा पाऊस पाडून रक्कम दुप्पट करून देतो अशी थाप मारली होती. त्यासाठी त्याने तिघांना शहराजवळील लांझी भागात नेऊन तेथे अंधारात बॅटरीच्या प्रकाशाद्वारे पैशांचा पाऊस पडल्याचा बनाव केला. त्यामुळे तिघांनाही त्यावर विश्वास बसला.

एकनाथ शिंदेंसमोरचा माईक का खेचला? फडणवीसांनी खरंखुरं कारण सांगितलं
त्यानंतर मांत्रिकाने तिघांना शिर्डी येथील नातेवाईकांच्या घरी नेऊन परत बॅटरीद्वारे पैशाचा पाऊस दाखवला. त्यानंतर वेळोवेळी रोख व ऑनलाइन मिळून तब्बल ११ लाख ६२ हजार रुपये तिघांकडून उकळले. पुन्हा मांत्रिक साळुंके याने विधिवत पूजा करायची सांगून ९० हजाराची मागणी केली. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचा तिघांचा संशय बळावला. तिघांची गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार दिली. पथकाने शहरातील एका हॉटेल मधून तिघांना अटक केली. याप्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने जिल्ह्यात अजूनही गुन्हे केले आहेत का याचा तापास आता पोलीस करत आहेत.

अरे बापरे! बँकिंग लायसन्स रद्द का करू नये? RBI ची ‘या’ बँकेला नोटीस

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : aurangabad crime news 11 lakhs to the businessmen by showing the lure of raining money to the accused magicians
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here