यानंतर विपुलच्या कुटुंबानं संपूर्ण सामान घेऊन मध्यरात्री घर सोडलं आणि ते मुंबईच्या साकीनाका येथे असलेल्या रिलॅक्स रेसिडेन्सी हॉटेलमध्ये पोहोचले. आपण नव्या कंपनीत रुजू झालो असून राहण्याचा खर्च कंपनीच करणार असल्याची बतावणी विपुल प्रधाननं केली. विपुलनं १५ दिवसांसाठी दोन खोल्या बुक केल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.
एप्रिलमध्ये हॉटेल प्रशासनानं प्रधानला बिल भरण्यास सांगितलं. बिल भरण्यासाठी प्रधाननं अकाऊंटट असलेल्या त्याच्या सहकाऱ्याचे पैसे चोरले. ‘आजारी वडिलांच्या उपचारांसाठी अकाऊंटंटनं १.२ लाख रुपये काढले होते. मात्र ही रोख रक्कम गायब असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिनं तक्रार दाखल केली,’ असा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला.
वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथ तयार केलं. कुणा मोहिते यांच्या नेतृत्त्वाखाली पथकानं तपास सुरू केला. पोलिसांनी प्रधानच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं. त्यात प्रधान रोख रक्कम चोरताना दिसला. त्यानंतर प्रधानचा शोध सुरू झाला. मात्र चार महिने त्याचा ठावठिकाणा पोलिसांना सापडला नाही. प्रधान लोणावळ्यात लपून बसल्याची माहिती पोलिसांना या महिन्याच्या सुरुवातीला मिळाली. यानंतर पोलिसांनी प्रधानला अटक केली.