पुणे : पुण्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे सासूने आपल्या मुलीला जेवायला दिलं नाही म्हऊन सुनेने सासूचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरातून खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सून बाहेर गेली असता सासूने घरी स्वयंपाकच केला नाही. त्यामुळे मुलीला जेवण मिळालं नाही आणि ती उपाशी राहिली. यावरून दोघींमध्ये वाद झाली आणि यातूनच गुन्ह्याचा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा अशोक मुळे राहणार चाकण असं हत्या झालेल्या सासूचं नाव आहे तर सुवर्णा सागर मुळे (वय ३२) असं आरोपी सुनेचे नाव आहे.

गुरूपौर्णिमेला फडणवीसांची भेट घेणाऱ्या शिवसेना नेत्याला उद्धव ठाकरेंकडून दणका
गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी आरोपी सुनेला ताब्यात घेतलं आबे. दोघींमध्ये सतत वाद सुरू असायचे. अशात मुलीला जेवण न देण्यावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला आणि सुनेनं नायलॉनच्या दोरीने सासूचा गळा आवळला. यामध्ये सासू सुषमा या बेशुद्ध झाल्या. पण यानंतर आरोपी सुनेनं असं काही केलं पोलिसांनाही धक्का बसला.

सासू बेशुद्ध अवस्थेत पडली असताना तिला तसंच पडून दिलं. काही वेळाने मुलगा घरी आल्यानंतर सासूला फीट येऊन पडल्या असं तिने सांगितलं. मुलाने तातडीने रुग्णलयात नेलं असता तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर डॉक्टरांना आलेल्या शंकेमुळे त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली असता सूनेने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

किल्ल्यावर ट्रेकिंग करताना अचानक दोन मित्र दरीत कोसळले; एकाचा जागीच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here