नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि गुजरातला गेल्या दोन आठवड्यात पावसाने झोडपून काढलं होतं. पण आता वरुणराजा विश्रांती घेणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरामध्ये पुढच्या ३-४ दिवसामंध्ये पावसाचा जोर कमी होईल पण देशातल्या इतर ५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये येत्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. उत्तर प्रदेशातही या काळात काही ठिकाणी पाऊस पडेल. IMD ने हिमाचलमध्ये १६ जुलैला, राजस्थानमध्ये १७ जुलैला, पंजाब आणि हरियाणामध्ये १९ पर्यंत, उत्तराखंडमध्ये १६ आणि १७ जुलैला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

काय सांगता! मुंबईत पाणी तुंबण्याची उरली फक्त ८० ठिकाणे; महापालिकेने केला दावा
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. पण आता पाऊस थोडी उसंत मारणार असल्याचा अंदाज आहे. छत्तीसगड, विदर्भ, मध्य प्रदेश, ओडिशा, गोवा, केरळ आणि किनारी कर्नाटकात पुढील ५ दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. त्याचप्रमाणे १६ जुलै रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.

खाजगी हवामान संस्था स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, ईशान्य अरबी समुद्र आणि गुजरातच्या लगतच्या किनारी भागात चक्रीवादळ प्रणाली कायम आहे. त्याच्या प्रभावाखाली गुजरात किनारपट्टीच्या पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर उत्तर ओडिशा आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र कायम असून ते नैऋत्य दिशेने सरकत आहे.

पुणे: दवाखान्यात नेईपर्यंत सासूचा मृत्यू, डॉक्टरांच्या एका शंकेने सुनेचं पितळं उघड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here