हे वाचा-वाढदिवस साजरा करायला कतरिना परदेशात, विकीसोबत इथे करणार जंगी बर्थ डे पार्टी
विवेक अग्निहोत्री यांच्या निशाण्यावर आता बॉलिवूडची खान मंडळी आहेत. हिंदी सिनेमा इंडस्ट्रीसाठी खान मंडळींना जबाबदार धरले आहे. त्यांनी ट्वीट करत या सुपरस्टार्सवर कमेंट केली आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,’जोपर्यंत किंग, बादशाह सुलतान आहेत तोपर्यंत बॉलिवूड बुडतच जाणार. जर तुम्ही लोकांच्या कथा सांगणारी लोकांची इंडस्ट्री बनवली तरच इंडस्ट्री जागतिक स्तरावर नेतृत्त्व करेल.’

शाहरुख खानने १९९९ साली ‘बादशाह’ सिनेमात काम केलं होतं, त्यानंतर तो बादशाह किंवा किंग खान अशा नावाने ओळखला जाऊ लागला. तर सलमान खान याचा ‘सुलतान’ लोकप्रिय ठरला. विवेक यांनी शाहरुख-सलमानचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली आहे. पण त्यांनी ‘किंग’, ‘सुलतान’, ‘बादशाह’ हे शब्द वापरले आहेत. ‘शाहरुख अजूनही बॉलिवूडचा किंग का आहे?’ अशा आशयाचा एक मीडिया रिपोर्ट रीट्वीट करताना विवेक यांनी टीका केली आहे. दरम्यान या ट्वीटनंतर विवेक सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरले आहेत.
हे वाचा-कोण होती ती दोन सख्खी भावंडं ज्यांना सारा- जान्हवीने केलं डेट!
विवेक अग्निहोत्री यांचे जुने ट्वीट्स व्हायरल
यानंतर नेटकऱ्यांनी विवेक यांचे एक जुने ट्वीट रीट्वीट करत त्यांना ट्रोल केले आहे. २०१४ चं हे ट्वीट आहे, ज्यात त्यांनी शाहरुखचा उल्लेख केला आहे. ‘सरडा तरी वेळ घेतो रंग बदलण्यासाठी, विवेक अग्निहोत्री त्याहीपेक्षा पुढे आहे’, ‘एक सिनेमा हिट झाला म्हणून जास्त उडू नको..’, अशा विविध कमेंट्स लोकांनी विवेक अग्निहोत्रींच्या पोस्टवर केल्या आहेत. विवेक जुन्या एका ट्वीटमध्ये SRK चं कौतुक करत आहेत, त्या ट्वीटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.