औरंगाबाद : लग्नाचे स्वयंपाक सुरू असताना भात शिजविण्यासाठी उकळलेल्या पाण्याच्या भांड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सिल्लोड तालुक्यातील पालोद येथे घडली आहे. हसनैन कलीम पठाण असे मृत बालकाचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कलीम पठाण यांच्या घरी ७ जुलै रोजी विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक सुरू होता. यावेळी एका पातेल्यात तांदूळ शिजविण्यात आला होता. काही वेळाने शिजलेला तांदूळ बाजूला काढून उकळलेले पाणी पातेल्यात तसेच ठेवण्यात आले होते. त्याचवेळी दीड वर्षांचा हसनैन सर्वांची नजर चुकवून त्याठिकाणी पोहोचला आणि कुणाच्या काही लक्षात येण्याच्या आधीच उकळते पाणी असलेल्या पातेल्यात पडला.

पंढरपूरला वारीत असताना मुलाची आत्महत्या, वारीवरून परतताच वडिलांनी केलेल्या कृत्यामुळे बीड हादरलं
चटका बसल्याने तो जोरजोरात रडू लागला. यामुळे आई-वडिलांसह सर्वांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत हसनैनची त्वचा खूप भाजली होती. तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने सिल्लोड येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला औरंगाबादच्या घाटीमध्ये हलविण्यात आले. येथे त्याच्यावर आठ दिवस उपचार सुरु होते. मात्र, अखेर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुणे: दवाखान्यात नेईपर्यंत सासूचा मृत्यू, डॉक्टरांच्या एका शंकेने सुनेचं पितळं उघड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here