परभणी : तू दिसायला चांगली नाहीस, कामधंदा बरोबर येत नाही, सतत घरगुती कारणावरुन मानसीक छळक करून सतत त्रास दिल्या जात एका ४५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना परभणीच्या सोनपेठ शहरातील शारदा नगर येथे घडली आहे. विजया राजेश लांडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे.

सोनपेठ शहरातील शारदानगर येथील विजया राजेश लांडे या विवाहितेला मागील काही दिवसापासून सासरची मंडळी तू दिसायला चांगली नाहीस, कामधंदा बरोबर येत नाही, सतत घरगुती कारणावरुन मानसीक छळक करुन सतत त्रास देत होती. अखेर विजया यांनी १५ जुलै रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे.

लग्नाचा स्वयंपाक सुरू असताना हृदयद्रावक घटना, दीड वर्षाचा चिमुकला उकळत्या पाण्यात पडला अन्…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी विवेक केशवराव भुते (वय ४० वर्ष, रा. पेठविभाग रा. चारठाणा यांच्या फिर्यादीवरुन आरोपी राजेश बाळकृष्ण लांडे (पती), रवि बाळकृष्ण लांडे (दिर ), अर्चना रवि लांडे ( जाऊ) या तीन जणांविरुध्द कलम ३०६, ४९८ (अ) ३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास संदिप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णु गिरी हे करत आहेत.

पंढरपूरला वारीत असताना मुलाची आत्महत्या, वारीवरून परतताच वडिलांनी केलेल्या कृत्यामुळे बीड हादरलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here