Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबादचं नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ असं करण्यात आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

 

eknath shinde surat
एकनाथ शिंदे
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयांना नव्याने स्थापन झालेल्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ‘२९ तारखेला तत्कालीन सरकार अल्पमतात असताना त्यांनी घाईघाईने काही निर्णय घेतले होते. मात्र या निर्णयांबाबत पुढे जाऊन काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून आम्ही पुन्हा याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगतला होता. आजच्या बैठकीत आम्ही औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई येथील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : the decision to change the name of aurangabad to chhatrapati sambhajinagar instead of sambhajinagar cm eknath shinde announcement
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here