मुंबई: १९९८ साली आलेला अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ (Sooryavansham) हा सिनेमा अजूनही सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. अजूनही या सिनेमाविषयी मीम्स बनत आहेत. प्रदर्शनानंतर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई केली नव्हती, पण त्यानंतर टेलिव्हिजनवर अनेकदा हा सिनेमा दाखवण्यात आला. टेलिव्हिजनमुळे या सिनेमाची एक वेगळी फॅन फॉलोइंग निर्माण झाली आहे. यातील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या लक्षात आहे. दरम्यान तुम्हाला ‘सूर्यवंशम’मध्ये काम करणारा तो बालकलाकार आठवतोय का?

Sooryavansham Movie

सूर्यवंशम सिनेमातील एक क्षण (फोटो सौजन्य- यूट्युब)

हे वाचा-भाच्यासोबत सेक्शुअल रिलेशनमध्ये असल्याचा आरोप, पॉपस्टारने दिली अशी प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन या सिनेमात डबल रोल करत आहेत. त्यांनी हिरा ठाकूर आणि त्याचे वडील भानुप्रताप ठाकूर या भूमिका साकारल्या आहेत. सिनेमात भानूप्रताप यांचा नातू अर्थात हिराचा मुलगा त्याला खीर खाऊ घालतो असा सीन आहे. हा दृश्यातील तो लहान मुलगा आठवतोय का? सूर्यवंशममध्ये आनंद वर्धन या बालकलाराने ही भूमिका साकारलीये.

Anand Vardhan Sooryavansham

सोशल मीडियावर आनंदचे काही फोटो व्हायरल झाले आहेत

आता इतक्या वर्षानंतर आनंदमध्ये खूप बदल झाला असून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. सोशल मीडियावर त्याचे विविध फोटोज व्हायरल झाले आहेत, ज्यात त्याच्यामध्ये फार बदल झाल्याचे दिसून येते आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन २० वर्षांहूनही अधिक काळ लोटला आहे, तरीही ‘सूर्यवंशम’ चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

anand Vardhan sooryavansham child actor

सोशल मीडियावर आनंदचे काही फोटो व्हायरल झाले आहेत

हे वाचा-करिना तिसऱ्यांदा प्रेग्नंट? लपवण्याचा प्रयत्न करूनही दिसला बेबी बंप

अभिनेता आनंद वर्धन हा एक तेलुगू अभिनेता असून त्याने यानंतर २० हून अधिक दाक्षिणात्य सिनेमात काम केले आहे. त्याने बालकलाकार म्हणून प्रियराग्लू या सिनेमातून पदार्पण केले होते, त्यानंतर त्याने सूर्यवंशममध्ये काम केले. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या विविध मुलाखती देखील व्हायरल जाल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आनंद याचे आजोबा पी.बी. श्रीनिवास हे एक गायक होते. त्यांनी दक्षिणेकडील विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. ज्यात तामिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी अशा विविध भाषांंचा समावेश आहे. त्यांना त्यांच्या नातवाला अभिनेता बनवायचे होते. आनंदने विविध सिनेमांमध्ये काम करत त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here