स्वत:ची कार आणतोय, नावही ठरलंय… म्हणत ‘दे धक्का २’चा टीझर आला, Video पाहून हसू
डाॅ. कोल्हे लिहितात, ‘अशा वातावरणात शूटिंग करणे म्हणजे वेडेपणा आहे, आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटिंग? कसं शक्य आहे? अनेकांच्या अनेक शंका…. पण प्रत्यक्ष इतिहास जणू ३५६ वर्षांनंतर त्या घटनेला कॅमेऱ्याच्या लेन्समधून पाहणार होता. ASI नियमावलीचे पालन करता करता होणारी दमछाक, त्यात ३८-४० डिग्री असलं तरी ७०% आर्द्रतेमुळे ४२-४४ वाटणारं तापमान. तेही सकाळी ९ वाजता. चुकून टाचणी विसरली तरी किल्ल्यातून बेस कँपपर्यंत पायपीट, ना बसायला खुर्ची ना पंखा.. सावलीसाठी आडोशाला उभं राहावं तर घामाच्या धारा आणि जरा हवेशीर ठिकाणी उभं राहावं तर उन्हाच्या झळा.’
डाॅ. अमोल कोल्हे सांगतात,रोज ४-५ जण अंथरूण धरायचे नाही तर थेट हॉस्पिटल मध्ये. तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ‘ बचेंगे तो और भी लडेंगे’ या ईर्षेने शूटिंग सुरू. ते पुढे लिहितात, ‘पण यात खरं कौतुक करायला हवं ते आमच्या टीममधील सेटिंग बाॅइज, स्पाॅट बाॅइज,लाइट बाॅइज, काॅस्च्युम डिपार्टमेट, दिग्दर्शकांची टीम, कॅमेरा टीम आणि ज्युनियर आर्टिस्टचं.’ कारण या सर्व प्रतिकूलतेत ते सर्वजण ठाम होते.’

ते पुढे लिहितात, ‘महाराजांच्या पेहरावात मी जेव्हा लाल किल्ल्यात पाऊल ठेवलं तेव्हा भारावलेले, अगदी डोळे भरून तो प्रसंग डोळ्यात साठवणारे आणि ३५६ वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाच्या पुनर्प्रत्ययाचे ते सर्वजण पहिले साक्षीदार होते. चेनमधल्या सर्वात दुबळ्या लिंकची क्षमता पाहूनच अख्ख्या चेनचं सामर्थ्य कळतं’
या उक्तीप्रमाणे टीमची ताकद दाखवून देत होते आणि आमचा टीम लीडर, आमचा दिग्दर्शक कार्तिक केंढे तर पहाडासारखा त्या प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय ठेवून उभा होता.
Post: सुष्मिता- ललितच्या नात्यावर रोहमन शॉल आनंदी की दुःखी?
शिवप्रताप गरुडझेप सिनेमाचं शूटिंग सगळ्यांसाठीचं मोठं आव्हान होतं. डाॅ. कोल्हे पुढे म्हणतात, ‘मला जाणवत होतं की आपापल्या परीने प्रत्येक मावळा लढत होता आणि प्रत्येकाची प्रेरणा लाल किल्ल्याकडे स्वाभिमानी नजर रोखून ताठ मानेने उभी होती. शतकानुशकं अजरामर प्रेरणा, छत्रपती शिवाजी महाराज!’
मुलाला वाढवताना केलेल्या कोणत्या गोष्टीबद्दल निवेदिता सराफ यांना वाटते खंत?