लंडन: आयपीएलची सुरुवात करणारा आणि उद्योगपती ललित मोदी दोन दिवसांपासून चर्चेत आला आहे. मोदीने १५ जुलै रोजी रात्री उशिरा एक ट्विट केले होते, या ट्विटमध्ये त्याने बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला डेट करत असल्याचे म्हटले होते. मोदीने सुष्मितासह मालदीवमधील फोटो देखील शेअर केले होते. पण हे फोटो शेअर करत असताना त्याने एक मोठी चूक केली.

आयपीएलमध्ये केलेल्या भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळ्यात भारतातून फरार झालेल्या ललित मोदीने सुष्मिताचा उल्लेख बेटर हाफ असा केला. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि बातमी देखील वेगाने पसरली. त्यानंतर मोदीने आणखी एक ट्विट केले आणि हे देखील स्पष्ट केले की आम्ही एकमेकांना डेट करत आहोत, अद्याप लग्न झाले नाही. ते लवकरच होईल.

वाचा- आईच्या मैत्रिणीशी विवाह; ९ वर्षांनी मोठ्या मीनलसोबतची लव्हस्टोरी वाचून सुष्मितालाही…

मोदी आणि सुष्मिता यांच्या नात्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियात सुरू आहे. मोदीने ज्या ट्विट पोस्टच्या माध्यमातून सुष्मितासोबतचे नाते जगाला सांगितले होते, त्या ट्विटमध्ये एक मोठी चूक केली होती. मोदीने संबंधित ट्विटमध्ये सुष्मिता सेनला टॅग केले होते. पण प्रत्यक्षात त्याने ज्या अकाउंटला टॅग केले ते सुष्मिताचे नाहीच.

वाचा- ड्रग्स, धोकादायक शस्त्रांनी हल्ला, तुरुंगवास आणि बरच काही; ललित मोदीबद्दल या गोष्टी तुम्ही…

Lkm

ललित मोदीने sushmitasen47 या अकाउंटला टॅग केले. पण ट्विटरवर सुष्मिताचे खरे अकाउंट @thesushmitasen हे आहे.

वाचा- वनडेत झाल्या ७१९ धावा; आयरर्लंडची फलंदाजी पाहून न्यूझीलंडला घाम फुटला

sen

मोदी आणि सुष्मिता एकमेकांना कधीपासून डेट करत आहेत हे कळाले नसले तरी सुष्मिताचे खरे अकाउंट कोणते हे न पाहताच टॅग केले.

ss

दरम्यान मोदी सोबतच्या नातेसंबंधांवर सुष्मिताचा भाऊ, वडील आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here