पिंपरी: आजकाल आत्महत्या करणे खूप सोपे झाल्यासारखे वाटते. सोशल मीडियाचा वापर करून आत्महत्या करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पुण्यातही तसेच प्रकार समोर येत आहेत. अगदी क्षुल्लक कारणावरूनदेखील आत्महत्या केली जात आहे. पुण्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अक्षय माटेगावकर या २१ वर्षीय युवकाने नोकरी मिळेल की नाही या चिंतेतून आत्महत्या केली. अक्षय हा अभिनेत्री केतकी माटेगावकरचा चुलत भाऊ होता.

आत्महत्या हत्या करताना आजच्या पिढीला खरच काही वाटत नसेल का? किंवा त्यांची मानसिक स्थिती एवढी ढासळलेली आहे का की ते तेवढ्या टोकाचा निर्णय अगदी सहजपणे घेतात. इंजिनीयरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत असलेल्या अक्षयने काल आत्महत्या केली. अक्षय माटेगावकर याच्या घरची परिस्थिती चांगली होती. शिवाय तो उत्तम गायकही होता. तो अनेक गजलांचे कार्यक्रमही करत होता. सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षामध्ये शिकत होता.
मला माफ करा! दुसरा कोणताच पर्याय नाही!! अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या
अक्षयला असे कुठलेही टेन्शन नव्हते. सर्वांशी तो मोकळेपणाने बोलत होता. शिवाय त्याने दोन दिवसांपूर्वीच नवीन बाईक घेतली होती. कॉलेज जवळ असावं आणि अभ्यासात व्यत्यय येऊ नये यासाठी अक्षयने ५ मित्रांसह कॉलेजजवळ भाड्याने फ्लॅट घेतला. दोन दिवसांपूर्वी अक्षयची सगळी भावंडं घरी जमली आणि गायनाची प्रॅक्टिसदेखील केली. आमच्या घरात सर्व उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे तसे तणावाचे काही कारण नाही. अक्षयने कधीही चेहऱ्यावर तणाव दाखवलाच नाही. त्याची स्वप्नं, त्याच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या. त्याची एखादी अपेक्षा पूर्ण होत नसेल म्हणून कदाचित त्याने हे पाऊल उचलले असावे असा अंदाज त्याच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आला. अक्षय हा खूप शालीन आणि अभ्यासू होता, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

अक्षयच्या जाण्याने कुटुंबियांना मोठा हादरा बसला आहे. त्याच्या मित्रांनाही जबर मानसिक धक्का बसला आहे. अक्षयला आपल्यातून गेला हे मानायलाच ते तयार नाहीत. ते सध्या कोणासोबतही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here