तेल अवीव : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. पॅलेस्टाईनमधील बंडखोरांनी आज पहाटे गाझा पट्टीवरून इस्रायलमध्ये रॉकेट हल्ले केले. या रॉकेट हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. पॅलेस्टिनी बंडखोरांनी इस्त्रायलच्या भागात ४ रॉकेट डागले होते. यानंतर इस्रायलकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.

पॅलेस्टाईन बंडखोरांच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलच्या सुरक्षा दलांनीही (IDF) या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. इस्रायलकडून हवाई हल्ल्यांनी प्रत्युत्तर देण्यात येत आहे, असं शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

प्रत्युत्तरा दाखल इस्रायलकडून करण्यात येत असलेले हवाई हल्ले हे बंडखोरांची संघटना हमासच्या ठिकाणांवर करण्यात येत आहे. हमासकडून शस्त्रास्त्र ठिकाणांवर हे हल्ले केले जात आहेत, असं इस्रायलच्या सैन्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. इस्रायल संरक्षण दलाच्या विमानांनी हमासच्या ठिकाणांवर हल्ले केले. ही भूमिगत ठिकाणं आहेत आणि तिथे रॉकेट तयार केले जातात. यासोबत या ठिकाणी हमास आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा इस्रायलच्या सैन्य दलाकडून करण्यात आला आहे.

Israeli airstrikes in Gaza City

पॅलेस्टिनी बंडखोरांचा रॉकेट हल्ला, इस्रायलचे हवाई हल्ल्याने प्रत्युत्तर

मेक्सिकोत मोठी दुर्घटना, नौदलाचं हेलिकॉप्टर कोसळलं, १४ जणांचा मृत्यू, एका जखमीवर उपचार सुरु

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या दौऱ्यावर होते. त्यांचा दौरा संपताच हल्ले सुरू झाले.

भीषण गरमीमुळं जलाशयाचे पाणी आटले अन् ४०० वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेले गाव सापडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here