पालघर : पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी काही नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिंदे गटात सामील झाल्याचं वृत्त माध्यमांनी चालवलं. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पालघरमध्ये ठाकरेंना धक्का मानला गेला. परंतु आता खासदार राजेंद्र गावित यांनीच याप्रकरणी खुलासा केला आहे. मी शिंदे गटात सामिल झालेलो नाहीये. माझ्या मतदारसंघातील कामासाठी मी आणि आमचे नगरसेवक नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो, असा खुलासा करत शिंदे गटातल्या प्रवेशाच्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलं.

पालघर जिल्ह्याचे सेना संपर्कप्रमुख रविंद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख राजेश शहा यांची पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेऊन शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्याने मागील पंधरा दिवस रोज कुणाची ना कुणीची शिवसेनेतून हकालपट्टी होत आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी काही नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली. या चर्चांना स्वत: खुलासा करुन खासदार राजेंद्र गावित यांनी पूर्णविराम दिला.

ना १७ ना १९, शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराला नवा मुहूर्त, किती जणांचा शपथविधी?
“आदिवासी भागातील रस्त्यांची पूर्ण चाळण झाली आहे. गेल्या १० वर्षांपासून त्या भागातील रस्ते झालेले नाहीत. हाच विषय त्यांच्या कानावर टाकण्यासाठी मी त्यांची भेट घेण्यासाठी गेलो. मी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला नाही. शेवटी ते राज्याचे मुख्यमंत्री असल्याने कुठल्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी त्यांना भेटू शकतात. माझ्या मतदारसंघातील कामे करवून घेण्यासाठी मी त्यांना भेटलो”, असं खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितलं.

चहूबाजूंनी अडचणीत आलेल्या डिसले गुरुजींना फडणवीसांचा आधार, म्हणाले…
“जिल्ह्यातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यांनी प्रवेश केला म्हणजे माझी त्यांना मूकसंमती आहे, असं नाही. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली म्हणजे मी लगेच शिंगे गटात प्रवेश केला असं होत नाही. मी अजूनतरी शिंदे गटात प्रवेश केलेला नाही. मतदारसंघातील कामांसाठी भेट घेण्याचा मला नक्कीच अधिकार आहे, असंही राजेंद्र गावित म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here