मुंबई- अभिनेत्री सुष्मिता सेन हिनं ललित मोदी याच्याबरोबर असलेल्या नातेसंबंधांबाबत मौन सोडलं आहे. जेव्हा सुष्मिताच्या नवीन अफेअर सोशल मीडियावरून जगजाहीर झालं तेव्हा तिच्यावर कडाडून टीका झाली. सोशल मीडियावरील काही युझर्सनी तर तिला ‘गोल्ड डिगर’ (संधी साधू) असं म्हटलं आहे. तर काहींनी सुष्मिता केवळ पैशांसाठी डेट करत असल्याचं म्हणत तिच्यावर टीका केली आहे.

भर पावसात यश आणि नेहाचा रोमान्स? पाहा कसा शूट होतोय सीन

ललित मोदीनं त्या दोघांमधले अत्यंत रोमँटिक फोटो ट्विटरवर शेअर करत त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. परंतु त्यावर सुष्मितानं अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आता मात्र सुष्मितानं काही न बोलताही तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुष्मितानं तिच्या बाजूनं असलेल्या काही कमेन्टला लाईक करत तिची बाजू मांडली आहे.


खरं तर ललित मोदी (Lalit Modi)आणि सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारचे तर्क व्यक्त करण्यात आले. जी महिला कधी काळी देशाची शान होती, जिनं दोन मुलींना दत्तक घेत त्यांचं संगोपन केले आहे. तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे.

सुष्मिता- ललितच्या नात्यावर काय बोलली वहिनी चारु असोपा?

सुष्मिता तिच्यापेक्षा १२ वर्षानं मोठ्या असलेल्या आणि फरारी ललित मोदीला डेट करत आहे, त्यावरून तिला टोमणे मारायला सुरुवात केली आहे, परंतु काही युझर्सनी सुष्मितावर होणाऱ्या या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यामध्ये युट्यूबर आणि समाज माध्यमांतील प्रभावक (सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर) आंचल अग्रवालचा समावेश आहे. आंचलनं सुष्मिताला पाठिंबा दिला आहे तसंच तिच्यावर टीका करणाऱ्यांचाही समाचार घेतला आहे.


सुष्मितानं केले आंचलचे ट्वीट लाईक

आंचलनं केलेल्या ट्वीटला सुष्मितानं लाईक केलं आहे. म्हणजेच सुष्मितानं काही न बोलता ललितबरोबरच्या प्रेम प्रकरणाबाबत तिचं मत मांडलं आहे. या ट्वीटमधूनच तिनं टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

ट्वीट

आंचलचा सुष्मिताला पाठिंबा

सुष्मितानं आंचलनं केलेली ट्वीट लाईक केली आहेत. आंचलनं तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘जेव्हा मी लहान होत तेव्हा मी सुष्मिताच्या अनेक मुलाखती वाचल्या ऐकल्या. त्यामध्ये तिनं अनेकदा म्हटलं होतं की, तिला जर हिरे हवे असतील तर ती स्वतः विकत घेते. त्यासाठी तिला कोणत्याही पुरुषाची गरज नाही. पितृसत्ताक आणि रुढीवादी विचारसरणीमध्ये वाढलेल्या महिलांना लग्न करण्यासाठी, त्यानंतर त्यांना चूल आणि मूल यापुरतं मर्यादित ठेवण्याच्या त्या काळात हे ती बोलली. मला ते आवडलं होतं. मला माहिती नव्हतं माझ्यासाठी हे असं करणं शक्य होतं की नाही, परंतु काही वर्षांनी मी ते केलं. मी स्वतःच्या मेहनतीनं आणि कर्तृत्वावर स्वतःसाठी हिरा विकत घेतला. शब्दांमध्ये ताकद असते आणि ती आपल्यातही येते. तुमच्या कटू बोलांमध्येही शक्ती असते. त्यामुळे अशा कुप्रथा पुढे सुरू राहतात.’


‘गोल्ड डिगर..का?’

आंचलनं तिच्या ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे की, ‘आता आपल्याला समजलं आहे की एका व्यक्तीला डेट करत आहे. ही व्यक्ती तिच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे, त्यामुळे तिला गोल्ड डिगर म्हटलं जातंय. मला नाही वाटत की Pete Davidson ला Kim ला डेट केलं म्हणून त्याला कोणी गोल्ड डिगर म्हटलं जाईल. त्याला हिरोप्रमाणं वागवलं जातं असं का? तो श्रीमंत नाही म्हणून की तो तिच्या वयाचा नाही म्हणून!’

जर चूक असेल तर त्याची आहे

आंचलनं तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘आजही आपण खूप पक्षपाती आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आहात तरी कोण हे चूक हे बरोबर ठरवणारे. ज्याची चूक आहे ती त्याची आहे. माझ्या मित्रानो, स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्या. कारण त्या व्यक्तिच्या चूकीमुळे तुम्हाला काहीच फरक पडणार नाहीये.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here