आत्महत्या केलेल्या मुलाची आई शाळेत शिक्षिका आहे. काही वर्षांपूर्वी मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. आई आणि मुलगा एका भाड्याच्या घरात राहत होते. मुलानं दोन दिवसांपासून आईकडे शाळेचा गणवेश खरेदी करण्याचा आग्रह धरला होता. तुझ्यासाठी गणवेश शिवू असं आईनं मुलाला सांगितलं होतं.
शुक्रवारी आईचा वाढदिवस होता. त्यादिवशी मुलानं आईकडे पुन्हा गणवेशासाठी हट्ट केला. त्यावर आई ओरडली. मला शाळेत जाण्यास उशीर होत आहे. संध्याकाळी आल्यावर तुझ्यासाठी गणवेश शिवायला देऊ, असं आई म्हणाली. यामुळे मुलाला नाराज झाला आणि त्यानं टोकाचं पाऊल उचललं.
भावंडांशी भेट, गाण्याचा सराव; दोनच दिवसात अक्षयच्या जाण्यानं माटेगावकर कुटुंबाला धक्का
आई घरी परतली त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. आईनं अनेकवेळा आवाज दिला. मात्र तिला आतून उत्तर मिळालं नाही. त्यानंतर आईनं शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा तोडला. त्यावेळी मुलगा गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. या घटनेची माहिती लगेचच पोलिसांना देण्यात आली.