मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये आत्महत्येच्या घटना वाढू लागल्या आहेत. एका तरुणानं ट्रेनसमोर उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना इंदूरमध्ये नुकतीच घडली आहे. या प्रकरणी जीआरपीनं गुन्ह्याची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

 

indore man jumped in front of train
इंदूरमधील तरुणाची आत्महत्या
इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये आत्महत्येच्या घटना वाढू लागल्या आहेत. एका तरुणानं ट्रेनसमोर उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना इंदूरमध्ये नुकतीच घडली आहे. या प्रकरणी जीआरपीनं गुन्ह्याची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

तरुणानं आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ चित्रित केला. त्यात त्यानं स्वत:च्या मृत्यूसाठी पत्नीला जबाबदार धरलं आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय पतीला होता. तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंदूरचा रहिवासी असलेल्या राजेश पटेलनं ट्रेनच्या समोर उडी मारत आत्महत्या केली. तरुणानं आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ चित्रित करून तो सोशल मीडियावर अपलोड केला. पत्नी त्रास देत असल्याचा आरोप पटेलनं केला आहे. पत्नीसोबतचे आणखी काही व्यक्तींवर त्यानं आरोप केले आहेत.
आता तुला शाळेला उशीर होणार नाही! हॅप्पी बर्थडे आई!! चिठ्ठी लिहून १५ वर्षीय मुलाची आत्महत्या
पत्नीपासून झालेली मुलं आपली नसल्याचा संशय पटेलनं व्हिडीओमध्ये व्यक्त केला. पत्नीकडे डीएनए चाचणीचा आग्रह धरला. मात्र तिनं नतार दिला. यामुळे आपण त्रस्त आहेत, असं पटेलनं म्हटलं. आता माझ्यासमोर आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच जीवन संपवत असल्याचं पटेलनं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
घरभाडे थकवले, १५ दिवस हॉटेलात काढले; शॉपिंगवेड्या अकाऊंटंटचा प्रताप पाहून पोलीस चक्रावले
जीआरपीच्या एएसपी राकेश खाका यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १३ जुलैची आहे. राजेश पटेल नावाच्या तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आलेला नाही. पोलीस सध्या पटेलच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची चौकशी करत आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : indore man who jumped in front of train suspected wife had affair wanted dna test of children
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here