anand mahindra tweets video of folding staircase: शहरातील दरबार फेब्रिकेशनच्या समीर बागवान, आसिफ पठाण आणि एजाज खान यांनी तयार केलेल्या फोल्डिंग जिन्याचे कौतुक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलंय. जिन्याचा व्हिडीओ ट्विट करून महिंद्रा यांनी जिन्याची निर्मिती करणाऱ्यांची स्तुती केली आहे.

 

mahindra staircase
उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडून जिन्याचे कौतुक
अहमदनगर: शहरातील दरबार फेब्रिकेशनच्या समीर बागवान, आसिफ पठाण आणि एजाज खान यांनी तयार केलेल्या फोल्डिंग जिन्याचे कौतुक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलंय. जिन्याचा व्हिडीओ ट्विट करून महिंद्रा यांनी जिन्याची निर्मिती करणाऱ्यांची स्तुती केली आहे.

दरबार फॅब्रिकेशनने अहमदनगर शहरातील जुन्या महापालिकेच्या समोर अतिशय अरुंद गल्लीत फोल्डिंग जिना बनवला. हा जिना फोल्ड करून भिंतीला लावतो येतो. त्यामुळे जेव्हा जिन्याचा वापर करायचा असेल तेव्हाच तो जिना काढता येतो आणि इतर वेळी तो भिंतीला लॉक करता येतो. हा जिना बनवल्यानंतर समीर बागवान यांनी त्याचा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर पोस्ट केला. हा व्हिडीओ महिंद्रा एँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी पाहिला. त्यांनी व्हिडीओ ट्विट केला.

अतिशय अरुंद जागेत उभारण्यात आलेल्या जिन्याचे आनंद महिंद्रांनी कौतुक केले आहे. ‘अप्रतिम. अतिशय साधं, पण सृजनशील. यामुळे घराच्या सामान्य भिंतीचं सौंदर्य वाढलं आहे. स्कॅन्डिनेव्हियन डिझाइनरनादेखील यामुळे आपला हेवा वाटेल,’ अशा शब्दांत महिंद्रा यांनी जिना आणि त्या जिन्याची निर्मिती करणाऱ्यांचं कौतुक केलं आहे.
बायको DNA टेस्टला नकार देतेय! व्हिडीओ करून तरुणाची रेल्वेसमोर उडी अन् मग…
महिंद्रा यांना ट्विट केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे. तर या व्हिडिओवर पाच हजारांपेक्षा अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. थेट आनंद महिंद्रा यांनी आपल्या कामाचे कौतुक केल्याने आपल्याला आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना दरबार फॅब्रिकेशनचे समीर बागवान यांनी व्यक्त केली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : anand mahindra tweets video of folding staircase of ahmednagar youth
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here