सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे सहारणपूर, नगीना आणि बिजनौरची जबाबदारी देण्याकडे आली आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे रायबरेली, मऊ, घोसी, श्रावस्ती आणि आंबेडकर नगरची जबाबदारी दिली गेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे मुरादाबाद, अमरोहा आणि मैनपुरीमध्ये लक्ष घालतील. राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे जौनपूर, गाझीपूर आणि लालगंज मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे पंजाबचे लुधियाना, संगरुर आणि हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावतांकडे पंजाबच्या आनंदपूर साहिब मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीला खिंडार पाडण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे.
सीतारामन यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. १९९६ पासून बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांचं वर्चस्व आहे. १९९६ ते २००९ पर्यंत याच मतदारसंघातून शरद पवार लोकसभेवर गेले. २००९ पासून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. २०१४ मध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सुळेंसमोर आव्हान उभं केलं होतं. मात्र त्यांचा जवळपास ७० हजार मतांनी पराभव झाला. २०१९ मध्ये भाजपनं सुळेंविरोधात कांचन कुल यांनी उमेदवारी दिली. मात्र सुळेंनी त्यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.
Home Maharashtra nirmala sitharaman, शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्याची तयारी; सीतारामन यांच्याकडे मोठी जबाबदारी...
nirmala sitharaman, शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्याची तयारी; सीतारामन यांच्याकडे मोठी जबाबदारी – lok sabha election 2024 bjp deputed cabinet ministers on 141 lok sabha seats
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. भाजपनं मिशन २०२४ हाती घेतलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या १४१ जागांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलं आहे. या जागा जिंकण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.