मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. आता ते लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आमदारांनी बंडखोरी केली असली तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार असून ठिकठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावे घेण्यात येणार आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आगामी महाराष्ट्र दौऱ्याचे त्यानुसार नियोजन करण्यात येणार असल्याचे कळते.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची तयारी आणि आखणी सध्या शिवसेना भवनात सुरू आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हेदेखील असतील.