पुणे : पुणे शहरातील रक्षकनगर परिसरात पहाटे ३ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. बिराजदार झोपडपट्टीला लागलेल्या या आगीत १२ ते १५ घरे जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेची माहिती स्थानिकांद्वारे अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या ५ गाड्यांसह जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
दरम्यान, या आगीत आर्थिक नुकसान झालेल्या रहिवाशांनी सरकारकडे मदतीची मागणी केली असून संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने लवकरात लवकर मदत करण्यात मिळावी, असं या नागरिकांचं म्हणणं आहे.