IndiGo Karachi Landing : इंडिगोचं विमान तांत्रिक बिघाडामुळं कराचीत उतरवण्यात आलं आहे. शारजातून हैदराबादला जाणारं विमान इंजिनमधील बिघाडामुळं कराचीकडे वळवण्यात आलं आहे.

हायलाइट्स:
- इंडिगोचं विमान कराचीत उतरवलं
- शारजाहून हैदराबादला निघालेलं विमान
- इंजिनमधील बिघाडामुळं निर्णय
१२ दिवसातील दुसरी घटना
स्पाईस जेट कंपनीचं एक विमान ५ जुलैला विमानातील तांत्रिक बिघाडामुळं कराची विमानतळावर उतरवण्यात आलं होतं. स्पाईसजेट बोईंग ७३७ विमान दिल्लीहून दुबईला निघालं होतं. त्या विमानात १६० प्रवासी होते. इंडिगोचं विमान देखील दुसऱ्या इंजिनमध्ये बिघाडामुळं कराचीत उतरवण्यात आलं. विमानातील स्वयंचलित यंत्रणेनं दुसऱ्या इंजिनमधील बिघाडाचा दोन वेळाइशारा दिल्यानंतर त्याचा मार्ग बदलला जातो. मात्र, सतर्कतेचा इशारा म्हणून विमान कराची विमानतळावर उतरवण्यात आलं आहे.
पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला मोठा हादरा; कोल्हापुरातील दोन्ही खासदार ‘जय महाराष्ट्र’ करणार?
इंडिगोच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंडिगो फ्लाइट ६ई-१४०६ हे विमान शारजा येथून हैदराबादला निघाले होते. वैमानिकाला तांत्रिक बिघाड जाणवल्यानं तातडीनं आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि विमान कराचीकडे वळवण्यात आल्याची माहिती इंडिगोच्या प्रवक्त्यांनी दिली.
पुण्यात मध्यरात्री भीषण आग: १२ घरे जळून खाक; लाखो रुपयांचं नुकसान
विमान प्रवासांबद्दल माहिती देणाऱ्या संकेतस्थळांच्या माहितीनुसार शारजातून स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री ११.०२ मिनिटांनी विमानानं उड्डाण घेतलं होतं. ते विमान चार तासांमध्ये हैदराबादला पोहोचणार होतं. मात्र, मध्यरात्री २.१५ मिनिटांनी ते कराची विमानतळावर उतरवण्यात आलं आहे.
उपराष्ट्रपती निवडणूक: शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक, शिवसेनेची भूमिका काय?
इंडिगोचं विमान दुसऱ्यांदा वळवलं
इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं १४ जुलै रोजी दिल्ली बडोदा विमान देखील जयपूरला उतरवावं लागलं होतं. विस्तारा कंपनीचं विमान ५ जुलै रोजी दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं होतं. मध्य आशिया आणि भारतीय उपखंडातील वातावरणाचा विमानाच्या इंजिनवर परिणाम होत असल्याचा विमानातील इंजिन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी केला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network