Kesariya Song Out: अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ब्रह्मास्त्र सिनेमासाठी चाहते जेवढे उत्सुक आहेत, त्याहीपेक्षा जास्त प्रतीक्षा त्यांना ‘केसरियाँ’ या गाण्याची होती. अखेर हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

 

Kesariya Song Out

हायलाइट्स:

  • केसरियाँ चाहत्यांच्या भेटीला
  • सर्वाधिक प्रतीक्षा असणारे ‘ब्रह्मास्त्र’मधील गाणं प्रदर्शित
  • आलिया-रणबीरचा ऑनस्क्रीन रोमान्स
मुंबई: अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra Movie) सिनेमाबाबत चाहत्यांना विशेष उत्सुकता आहे. पण त्याहून जास्त चाहते या सिनेमातील गाणं ‘केसरियाँ’च्या प्रतीक्षेत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. आलिया-रणबीरचं सर्वात रोमँटिक गाणं ‘केसरियाँ’ (Kesariya Song Out Now) काहीच मिनिटांपूर्वी प्रदर्शित झालं असून चाहत्यांच्या पसंतीसदेखील ते उतरत आहे. काही वेळापूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट आणि सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी इन्स्टाग्रामवर लाइव्ह होते. त्यांनी या गाण्याविषयी चर्चा केली, चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यानंतर हे गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे.

रणबीर कपूर सध्या ‘शमशेरा’च्या (Ranbir Kapoor Shamshera) प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याने तो या लाइव्हमध्ये नव्हता. त्यामुळे आलिया म्हणते की हे गाणं आता पूर्णपणे माझं गाणं असल्याचा मला जास्त आनंद होत आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर देखील या रोमँटिक गाण्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. ‘आमच्या प्रेमाचा आवाज आता तुमचाही आहे, केसरियाँ गाणं प्रदर्शित’, अशी कॅप्शन देत अभिनेत्रीने गाण्याचा एक छोटासा भाग इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तुम्ही युट्यूबवर हे संपूर्ण गाणं पाहू शकता.


इथे पाहा ‘केसरियाँ’चा संपूर्ण व्हिडिओ

अलीकडेच विवाहबंधनात अडकलेल्या आलिया-रणबीर जोडीचा पहिलावहिला सिनेमा ब्रह्मास्त्र ०९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यातील या गाण्याची झलक आलियाच्या वाढदिवशी प्रदर्शित करण्यात आली होती, पण संपूर्ण गाण्याच्या प्रतीक्षेत चाहते होते. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : kesariya song out brahmastra movie alia bhatt ranbir kapoor most awaited song released watch video here
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here