Deepali Sayed : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं अशी भूमिका दिपाली सय्यद यांनी मांडली आहे. शिवसैनिक म्हणून हे बोलण्याचा अधिकार असल्याचं त्या म्हणाल्या.

हायलाइट्स:
- उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं
- शिवसेना हे घर फुटू नये
- शिवसैनिक म्हणून मत मांडण्याचा अधिकार
मी एक शिवसैनिक म्हणुन काम करते. माझी इच्छा तुटलेलं घर एकत्र यावे ही आहे, असं दिपाली सय्यद म्हणाल्या. माझ्यावर कारवाई होण्याचा संबंध येत नाही. मी आजपर्यंत मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. मोठे नेते आहेत ते एकत्र येतील किंवा वेगळे होऊ शकतात. छोट्या कार्यकर्त्यांपासून आमदारांपर्यंत त्यांच्या मनातील इच्छा मांडत आहेत. दोन्ही गटांनी एकत्र येण्यात हित असल्याचं दिपाली सय्यद म्हणाल्या. दीपक केसरकर आणि शहाजीबापू पाटील यांनी एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. सर्व आमदारांच्या मनात हीच भावना असल्याचं दिपाली सय्यद म्हणाल्या.
उध्दव ठाकरे कुटुंब प्रमुख
कुटुंब प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे काम करत आहेत. त्यांनी मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचं म्हटलं आहे. आदित्य ठाकरे देखील तुम्ही सर्वजण या असं म्हणत आहेत. मानापमनाच्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. मात्र, कुठेतरी गोष्ट अडली आहे ती तोडण्याचं काम मी करत आहे, त्यात मला यश येईल, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
पुण्यात मध्यरात्री भीषण आग: १२ घरे जळून खाक; लाखो रुपयांचं नुकसान
तुटलेल घर एकत्र यावे
मी हे शिवसैनिकांच्या भल्यासाठी केलं आहे. शिवसेना हे माझं कुटुंब तुटू नये, असं मला वाटत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मला जे वाटले ते मी मांडलं आहे. प्रत्येकाच्या मनात इगो मानअपमान आहे. दुरावा दूर व्हावा, अशी भूमिका दिपाली सय्यद यांनी म्हटलं.
उपराष्ट्रपती निवडणूक: शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक, शिवसेनेची भूमिका काय?
तुटलेल घर एकत्र यावे असं कार्यकर्ता म्हणून मला वाटते. संजय राऊत हे मोठे आहेत त्यांना बलण्याचा अधिकार आहे. मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. संजय राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा आणि मध्यस्थी घडवून आणावी, अशी आशा दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
अभिमानास्पद… सिंधूने जेतेपदासह रचला इतिहास, चीनच्या खेळाडूवर साकारला दणदणीत विजय
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network