यवतमाळ : बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पावर फिरायला येणाऱ्या युवकाला पोहण्याचा मोह न आवरल्याने तो पाण्यात उतरला. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने सदर तरूण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली असून सचिन नंदलाल बडोद (वय १९ वर्ष, रा. शारदा चौक, यवतमाळ) असं मृत युवकाचं नाव आहे.

यवतमाळ शहरातील शारदा चौक येथील सचिन बडोद हा मित्राच्या शेतात जातो, असं सांगून घरातून बाहेर पडला होता. परंतु शेतात न जाता सर्व मित्र हे बेंबळा धरण परिसर पाहण्यासाठी गेले. यावेळी सचिन व त्याच्या मित्राला पोहण्याचा मोह झाला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने सचिनचा मृत्यू झाला.

सावधान! बूस्टर डोससाठी फोन आला अन् खात्यातून मोठी रक्कम गायब, मुंबई पोलिसांकडून धक्कादायक माहिती

गेल्या चार दिवसापांसून बेंबळा प्रकल्पाचे दोन गेट उघडले असल्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. परंतु प्रकल्पातील अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा हा पर्यटकांच्या जीवावर बेतत आहे . प्रकल्पातील पर्यटकांसाठी कुठलीही परवानगी नसताना अनेक लोक प्रत्यक्ष प्रवाहाजवळ जातात व आपला जीव धोक्यात घालतात. यातूनच ही घटना घडलेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाभुळगाव पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here