मुंबई : शिवसैनिक तोच आहे जो ठाकरे आणि मातोश्रीसोबत आहे. ज्या ज्या लोकांनी मातोश्रीला धोका दिला ते माझ्यासाठी गद्दारच आहे. त्यामुळे मी एकदा नाही तर लाख वेळा गद्दार म्हणणार. संतोष बांगर यांच्यात हिम्मत असेल तर माझ्या कानाखाली त्यांनी मारावी. त्यांच्या समर्थकांना मला फोन करायला सांगण्यापेक्षा, मला फोन करुन त्यांनी धमकी द्यावी, असं प्रतिआव्हान शिवसेनेची रणरागिणी अयोध्या पौळ यांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांना दिलं आहे.

ठाकरेंसाठी अश्रू ढाळणारे आणि शिंदे गटात जाण्यासाठी २४ तासांत पलटी मारलेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी काल कार्यकर्त्यांना चिथावणी देताना हिंसेची भाषा बोलली.जो आपल्याला गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली आवाज काढा, अशी चिथावणी त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. आपण मरेपर्यंत शिवसैनिक राहणार आहोत. पण आपल्याला का रे करत असेल तर त्यांच्या कानाखाली जाळ काढा, असं संतोष बांगर संतापून म्हणाले. त्यांच्या याच आव्हानाला सेनेच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांना प्रतिआव्हान दिलंय.

मंत्रिपद कोणाला नको? माझ्यात पुन्हा दहा हत्तींचं बळ येईल, संतोष बांगर यांचं शक्तिप्रदर्शन
“जे उद्धव ठाकरेंना सोडून गेलेत ते गद्दारच आहेत. मी त्यांना गद्दारच म्हणते. एकदा नाही लाख वेळा मी त्यांना गद्दार म्हणते. शिवसैनिक तोच आहे जो ठाकरे आणि ‘मातोश्री’सोबत आहे. ज्या ज्या लोकांनी ‘मातोश्री’ला धोका दिला ते माझ्यासाठी गद्दारच आहे. संतोष बांगर यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मला मारावं. त्यांच्या बगलबच्च्यांना मला फोन करुन धमकी द्यायला लावू नये. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी स्वत: मला फोन करावा”, अशा शब्दात अयोध्या पौळ यांनी ठणकावलं आहे.

जो गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली आवाज काढा, संतोष बांगरांच्या तोंडी हिंसेची भाषा
आईवडील म्हणतील लेकीने शिवसेनेसाठी जीव दिला

“करुन करुन ते काय करतील… हात पायच मोडतील ना… माझे आईवडील म्हणतील लेकीने शिवसेनेसाठी जीव दिला. तसं झालं तर माझ्यासारखी दुसरी भाग्यवान दुसरी कोण नसेन, तेव्हा त्यांच्या धमक्यांना मी घाबरणारी नाही. मी बाळासाहेब ठाकरेंची निष्ठावान आहे”, असं अयोध्या पौळ म्हणाल्या.

जो गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली जाळ काढा

आमदार संतोष बांगर यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांना चिथावणी दिली. ते म्हणाले, “मला सर्व शिवसैनिकांना एकच सांगायचं आहे. आपण बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. जे कुणी आपल्याला गद्दार म्हणत असेल, त्याच्या कानाखाली आवाज काढा. आपण घाबरणारे शिवसैनिक नाहीत. आपण बाळासाहेबांचे लढवय्ये शिवसैनिक आहोत. आम्हाला कुणी का रे म्हणलं, तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय गप्प राहणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here