| Lipi | Updated: Jul 17, 2022, 3:34 PM

Allu Arjun Fees: अल्लू अर्जुनचा सिनेमा ‘पुष्पा द राईज’नं बॉक्स ऑफिसवर भरभरक्कम कमाई केली आहे. या सिनेमातील सर्व कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत. लवकरच या सिनेमाचा सिक्वेल येणार असून त्यासाठी अल्लू अर्जुननं भरभक्कम मानधन आकारलं आहे.

 

बाबो! पुष्पा २ साठी अल्लू अर्जुननं घेतलं तगडं मानधन, आकडा वाचून येईल चक्कर
बाबो! ‘पुष्पा २’ साठी अल्लू अर्जुननं घेतलं तगडं मानधन, आकडा वाचून येईल चक्कर

हायलाइट्स:

  • अल्लू अर्जुननं पुष्पा २ साठी घेतलंय तगड मानधन
  • मानधनाचा आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
  • दिग्दर्शक सुकुमारनंही मानधनात केली दुप्पटीनं वाढ
मुंबई : दाक्षिणात्या सुपरडुपर हिट ‘पुष्पा द राईज’ या सिनेमानं २०२१ हे वर्ष गाजवलं. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या सिनेमानं घसघशीत कमाई केली आहे. पुष्पा सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि सामंथा रुथ प्रभू हे कलाकार उत्तर भारतामध्ये ही खूप लोकप्रिय झाले. त्यांच्या या लोकप्रियतेमुळे सिनेमाला ५०० कोटींचा व्ह्यू आहे. इतके व्ह्यू मिळवणारा हा पहिला भारतीय सिनेमा आहे. लवकरच या सिनेमाचा दुसरा भागही येणार आहे. त्याच्या चित्रीकरणालाही लवकरच सुरुवुात होणार आहे. परंतु पहिल्या भागाला मिळालेल्या तुफान लोकप्रियतेनंतर अल्लू अर्जुननं पुष्पा २ साठी तगडं मानधन घेतलं आहे. मानधनाचा आकडा ऐकून तुम्ही देखील आश्चर्यानं तोंडात बोटं घालाल….
त्या एका गोष्टीमुळं अमृता गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या, वाचा काय आहे तो किस्सा
एका न्यूज पोर्टलंनं दिलेल्या बातमीनुसार ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) या सिनेमासाठी अल्लू अर्जुननं ४५ कोटी रुपये आकारले होते. परंतु या सिनेमाच्या नफ्यामध्ये देखील त्याची भागीदारी होती. आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुन (Allu Arjun) बरोबरच दिग्दर्शक सुकुमार यानं देखील सिनेमाचा सिक्वेल दिग्दर्शित करण्यासाठीचं मानधन वाढवलं आहे. अल्लूनं पुष्पा २ साठी सुमारे ८५ कोटी रुपये मानधन घेतले आहे. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतकं मानधन घेणारा अल्लू हा पहिला अभिनेता आहे.

दिग्दर्शक सुकुमारनं घेतलं इतकं मानधन
दरम्यान, सिनेमाचे दिग्दर्शक सुकुमार यानं पहिल्या भागासाठी १८ कोटी रुपये मानधन घेतलं होतं. तर आता दुसऱ्या भागासाठी तो ४० कोटी मानधन घेणार असं सांगितलं जात आहे. पुष्पा द राईज सिनेमानं पहिल्या दिवशीपासूनच बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करायला सुरुवात केली होती. हिंदीमध्ये या सिनेमानं १०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर जागतिक पातळीवर या सिनेमानं ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
बाळासाठी इतकी घाई का केली? रणबीरने सांगून टाकलं खरं कारण

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : allu arjun fees for pushpa sequel is around rs 85 crores new record in telugu film industry
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here