जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक फटका नवापूर तालुक्याला बसला आहे. या भागात अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने नद्या ओसंडून वाहत होत्या तर काही ठिकाणी नदी काठच्या नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागलं आहे. इतकेच नाही तर या तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा देखील बंद करण्याची वेळ आली होती. अजूनही काही रस्ते पूल यांची दुरुस्ती झालेली नाही. आमदार, प्रशासनातील अधिकारी येऊन फोटो काढून गेले. मात्र, प्रशासन दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पालक आपल्या पाल्यांना खांद्यावर बसवून पाण्यातून पलीकडे शाळेवर सोडायला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. स्थानिक नागरिक या ठिकाणी माती मुरूम यांचा भराव करतांना देखील दिसून येत आहे. व्हायरल व्हिडिओ नवापूर तालुक्यातील असून प्रशासनाने याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावाने कोट्यवधी रुपये जिल्ह्यासाठी येत असतात. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे अशी सर्वांची अपेक्षा असते. मात्र, जिल्ह्यात पहिल्याच पावसात रस्त्यांची दुर्दशा झाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ‘खांद्यावर बसा अन् शाळेत जा, प्रशासन काही करणार नाही’ असाच काहीसा प्रश्न पालकांना पडला असल्याचं समोर येत आहे.
त्यासोबतच अनेक वाहनधारकांची देखील तशीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. चिखलाच्या रस्त्यातून आणि पाण्यातून वाहन चालवत पलीकडच्या गावाला जाण्यासाठी येथील वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन गेले पाहणी करून गेले. मात्र, तरी देखील झोपी गेलेले प्रशासनाला जाग येत नाही मोठी घटना होण्याची वाट बघताय का? असा प्रश्न पालकवर्ग आणि वाहनधारकांडून केला जात आहे.
‘नॅशनल क्रश’चा रेड हॉट लूक! पापाराझींच्या घोळक्यातच रश्मिका मंदानाचं फोटोशूट