प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी सध्या सुट्टीसाठी लंडनला गेले आहेत. स्नेहल तरडे यांनी एअरपोर्टवरचा एका व्हिडिओ शेअर करत लंडनला जात असल्याचं सांगितलं होतं. दोघंही सध्या लंडनमध्ये असून सुट्टीचा आनंद घेत आहेत. लंडनमध्ये त्यांनी नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावली.
लंडनमध्ये लायन किंग नाटक पाहायला तरडे दाम्पत्य पोहोचले. पण खास बाब म्हणजे मराठमोळ्या लुकमध्ये त्यांनी नाटकाच्या प्रयोगला हजेरी लावली. तसंच चाहत्यांना तुम्ही असात तिथल्या शहरातील नाटकाच्या प्रयोगांना जावं, नाटक पाहावं, असा सल्लाही दिला. नाटकामुळं तिथली माणसं कळता, असं तरडे म्हणतात.
‘खतरनाक’ या गाण्यातील प्रवीण ते ‘सरसेनापती हंबीरराव’ यांची भूमिका जगवणारे प्रवीण, या दोन्हीवर प्रेक्षकांनी प्रेम केले आहे. प्रवीण यांचे नाटकावर विशेष प्रेम होते, पण नाटक त्यांना सोडावे लागले होते, याचा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.