सोयाबीन पिकावरील आकस्मिक किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत ७५० रुपये प्रती हेक्टर अथवा ५० टक्के याप्रमाणे (कमाल १ हेक्टर क्षेत्रासाठी) जे कमी असेल त्या रक्कमेपर्यंत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. त्यासाठी आपल्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा. अशाप्रकारे शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या याप्रमाणे उपाय योजना केल्यास गोगलगायीचे नियंत्रण लवकरात लवकर आणि अधिक प्रभावीपणे होते. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क करावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.
उस्मानाबाद मध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव
मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. त्यापाठोपाठ लातूर जिल्ह्यात देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या समस्येला तोंड द्यावं लागलं आहे. बीड जिल्ह्यात तब्बल २०० हेक्टर वरील सोयाबीन पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांना या गोगलगाईच्या नियंत्रणासाठी क्रॉपसेप योजनेतून एमआयडीसी स्वउत्पादित औषधींवर अनुदान देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. तसेच कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली औषधे वापरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट याचे अनुदान जमा केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिलीय.
लाँचिंगपासून किंमतीपर्यंत ते मॉडलपासून फीचर्सपर्यंत iPhone 14 बद्दल सर्वकाही जाणून घ्या