कोण आहेत मार्गारेट अल्वा?
- मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या राहिल्या आहेत, पण सध्या त्यांचा काँग्रेसशी थेट संबंध नाही
- मार्गारेट अल्वा १९७४ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्या. यानंतर त्या सतत राज्यसभेच्या सदस्य राहिल्या.
- अल्वा १९९९ मध्ये लोकसभेवर निवडून गेल्या. त्यांनी केंद्रात मंत्री म्हणूनही काम केलंय.
- मार्गारेट अल्वा यांनी राजस्थान आणि गोव्याचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिलं आहे.
- कर्नाटकच्या रहिवासी असलेल्या मार्गारेट अल्वा या राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिल्या आहेत.
- त्या आतापर्यंत पाच वेळा खासदारही राहिल्या आहेत.
- राजकीय अनुभवसंपन्नता, प्रशासनावर उत्तम पकड आणि कायद्याचं उत्तम ज्ञान अशी मार्गारेट अल्वा यांची ओळख आहे.
विरोधकांची पवारांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल हे अनुपस्थित होते. यावर बोलताना पवार म्हणाले, “आम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यस्त होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही दिवसांपूर्वी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला असून लवकरच मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा जाहीर करणार आहेत”.
विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली असून नामांकनाची अंतिम तारीख १९ जुलै आहे. ६ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.