मुंबई : राज्यात सततच्या पावसामुळे गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये २० मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत. तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. सदर नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत.

उपराष्ट्रपती पदासाठी यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी, शरद पवार यांची घोषणा

परशुराम घाटात एकेरी वाहतूक

कोकण विभागात – रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात २०.१ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा दिनांक ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ०६ वा. पासून ते सायंकाळी ०७. वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी ०७. वा. ते सकाळी ०६ वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सदय:स्थिती

राज्यात ७३ तात्पुरता निवारा केंद्र तयार करण्यात आले असून आत्तापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे १०४ नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर १८९ प्राणी दगावले आहेत.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात

मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) पालघर -१, रायगड- महाड- १, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१, गडचिरोली -१ अशा एनडीआरएफच्या एकूण १५ तुकड्या तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ अशा एकूण दोन एसडीआरएफच्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी १८ तुकड्या तैनात

मुंबई -३, पुणे-२ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२, नागपूर-२ अशा एकूण ४ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)च्या कायमस्वरूपी तुकड्या तैनात केल्या आहेत.

IND vs ENG Live Score 3rd ODI : भारत आणि इंग्लंड सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here