जळगाव : जळगाव तालुक्यातील भोकनी शिवारातील गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी एका १३ वर्षाचा मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. चार मित्रांपैकी तीन जणांना वाचवण्यात नागरिकांना यश आले मात्र एक जण बुडाला. त्याचा आज रविवारी सकाळी मृतदेह आढळून आला आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगरात राहणारे चौघे शनिवारी १६ जुलै रोजी भोकणी गावाजवळ गिरणा नदीत पोहायला गेले होते. पोहत असताना हे सर्वजण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडत होते. हा प्रकार नदीकाठी असलेल्या काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यांना चौघांपैकी तिघांना काढण्यात यश आले पण एकाला ते बाहेर काढू शकले नाही. बरेच प्रयत्न केल्यानंतरही तो मुलगा गाळात अडकत गेला. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत मृतदेह शोधण्यास यश आले नाही.

उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरलेल्या UPA उमेदवार मार्गारेट अल्वा कोण?
रात्रभराच्या शोध मोहिमेनंतर आज रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अनिल फेगडे, पोलीस नाईक दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

मयत मुलगा हा नुतन मराठा शाळेत इयत्ता दहावीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई अनिता, वडील, मोठे २ भाऊ आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी NDA ला, उपराष्ट्रपतीपदासाठी UPA ला पाठिंबा, राऊत म्हणाले, हा शिवसेना पॅटर्न!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here