‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना सुष्मितानं तिच्या शब्दांत सडेतोड उत्तर दिलंय. सुष्मितानं आणखी एक पोस्ट करत सध्या तिच्या खासगी आयुष्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केलंय. लोकांना माजी मीस युनिव्हर्सच्या अफेअर्सबद्दल चर्चा करण्यात इतका रस आहे, असं तिनं म्हटलं. तर गोल्ड डिगर म्हणणाऱ्यांची कडक शब्दांत शाळाही घेतली आहे.
काय आहे सु्ष्मिताची पोस्ट?
आपल्या आजूबाजूची माणसं किती नकारत्मक ,असंतुष्ट होत चालली आहेत. हे सर्व हृदयद्रावक आहे. तथाकथित बुद्धीजीवी मतं मांडत आहेत. गॉसिप करत आहेत. ज्या मित्रांना मी कधीही भेटले नाही, ते देखील माझ्याविषयी बोलतायत. त्यांना माझ्या आयुष्याबद्दल खूप काही माहिती असल्यासारखं ते सर्वांना सांगत आहेत. माझ्या चारित्र्याबद्दल गप्पा मारत आहेत. मला गोल्ड डिगर म्हणून मोकळे होतायत आहेत. मस्तच!
महत्त्वाचं म्हणजे, मी सोन्यापेक्षा मी नेहमीत हिऱ्यांना प्राधान्य दिलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अजूनही ते स्वतः विकत घेते.
ललित मोदीसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर यावर स्पष्टीकरण देण्यासाठी सुष्मितानं एक पोस्ट शेअर केली होती. मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. लग्न नाही, साखरपुडा नाही. आजुबाजूला फक्त प्रेम. एवढं स्पष्टीकरण पुरे आहे . आता कामाला लागूया… असं म्हणत सुष्मितानं तिच्या दोन मुलींसोबतचा फोटो शेअर केला आहे. ललित मोदीसोबतच्या नात्यावर यावर सुष्मिता काय बोलतेय, याकडं सर्वांचच लक्ष लागलं होतं. अखेर तिनं पोस्ट शेअर करत खुलासा केला होता.
सुष्मितानं तिच्यावर होणाऱ्या टीकांवर भाष्य केलं असंलं तरी ललितसोबच्या नात्यावर मात्र बोलणं तिनं टाळलं आहे.