दिल्लीत (डीटीसी) कर्मचाऱ्याची त्याच्या दोन पत्नी आणि मुलीने मिळून केली असल्याचा खुलासा झाला आहे. या तिघांनी तीन वर्षांपूर्वी हत्येचा कट रचला होता. त्यानंतर तब्बल १५ लाख रूपये देऊन सुपारी देऊन आपल्या पतीची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नईम याला झारखंडमधून अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे आरोपीला विचारपूस केल्यानंतर त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत.
दिल्लीतील गोविंदपुरी भागात ६ जुलै रात्री डीटीसी बस चालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुलीसह मृताच्या दोन पत्नींना खुनाचा कट रचल्याप्रकरणी अटक केली होती. हत्येनंतर दोन्ही पत्नींना मालमत्ता आपापसात वाटून घ्यायची होती. दुसऱ्या पत्नीने या हत्येसाठी तिच्या लहान भावाला १५ लाखांची सुपारी दिली होती. हा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत त्याने अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.
चौकशीदरम्यान, आरोपी नईमने पोलिसांना सांगितले की, त्याला मृताची पत्नी नजमा उर्फ गीता हिचा चुलत भाऊ इक्बाल याच्यामार्फत संजीव कुमारच्या हत्येसाठी सुपारी देण्यात आली होती. मृत संजीव कुमार यांच्या मुलीने त्यांच्या खात्यात २० हजार रुपये ट्रान्सफर केले होते. खून करण्यासाठी आरोपी आपला मित्र मनीषसोबत दिल्लीत आला होता. लाजपत नगरमध्ये राहणाऱ्या मनीषच्या चुलत भावाची दुचाकी घेऊन ते आले होते. ६ जुलै २०२२ रोजी संजीव यांचा दुचाकीवरून पाठलाग करून दीपालय शाळेजवळ गोळ्या झाडण्यात आल्या. झारखंडमधील गोड्डा येथील जमुनी पहारपूर येथे राहणारा ३८ वर्षीय नईम अन्सारी ९वी पर्यंत शिकला आहे. तो गुजरातमधील वलसाड येथे शिंपी म्हणून काम करत असे.
पोलिसांनी शूटर नईम अन्सारीच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले असता तो दिल्लीहून झारखंडला पळून गेल्याचे निष्पन्न झाले. टीम झारखंडमध्ये पोहोचली आणि अथक प्रयत्नांनंतर नईमला पकडले. दरम्यान, त्यावेळी गावकरी तेथे जमले आणि त्यांनी नईमला पकडणाऱ्या पोलिसांच्या टीमला घेराव घातला आणि पोलिसांचा बाहेर निघण्याचा रस्ता बंद केला.
दोन्ही पत्नींची नवऱ्याच्या संपत्तीवर होती नजर
दरम्यान, एका पत्नीने सांगितले की, तिच्या पतीने दोन लग्न केले होते. संजीवच्या वागण्याने व्यथित होऊन त्याची पहिली पत्नी गीता आपल्या दोन मुलींसोबत दक्षिणपुरी परिसरात भाड्याच्या घरात राहत होती. पहिली पत्नी गीता, मुलगी कोमल आणि दुसरी पत्नी नजमा यांनी तीन वर्षांपूर्वी संजीव कुमारच्या हत्येचा कट रचला आणि संपत्ती आपापसात वाटून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिघांनी मिळून गुन्हेगारी कट रचला. नजमाने आरोपीचा नईमने १५ लाख रुपयांमध्ये हत्येचा सौदा निश्चित केला होता. यानंतर संजीवची हत्या करण्यात आली.