कोल्हापूर : राज्यातील शिवसेनेच्या ४० आमदारांपाठोपाठ आता १४ खासदारही बंडखोरीच्या तयारीत आहेत. राष्ट्रपतिपदासाठीचे मतदान होताच आज एक मोठा गट सेनेतून बाहेर पडल्याची घोषणा करणार असून या गटाच्या मुख्य प्रतोदपदी खासदार भावना गवळी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे सोमवारी अथवा मंगळवारी राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप होणार आहे.

शिवसेनेला विधानसभेत मोठे खिंडार पाडत भाजपने महाराष्ट्रात सत्ताबदल घडवून आणला. तेव्हापासून खासदारांना आपल्या गटात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रयत्न सुरू होते. सेनेचे लोकसभेत १८ खासदार आहेत. यातील काही खासदार पहिल्याच प्रयत्नात गळाला लागले. पण हा आकडा कमी होता. त्यामुळे किमान १४ खासदारांची बंडाची मानसिकता होईपर्यंत गुप्तता पाळण्यात आली. आता मात्र १४ हा आकडा पूर्ण झाल्याचे समजते. भावना गवळी आणि संजय मंडलिक यांनी उघडपणे बंडाची भाषा केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शिंदे गटात जात असल्याचे स्क्रिप्ट त्यांनी तयार केल्याचं बोललं जात आहे.

मोठी बातमी! भाजपच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला, भर रस्त्यात कार थांबवून धारदार शस्त्राने वार

दरम्यान, दोन दिवसापूर्वीच सेनेच्या १४ खासदारांची एक यादी तयार करण्यात आली आहे. विधानसभेतील एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच हा मोठा गट शिवसेनेतून सोमवारी बाहेर पडणार आहे. हा गट स्वतंत्र राहणार असून त्याच्या प्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते.

एकनाथ शिंदे काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याच्या तयारीत; १५ ते २० आमदार फुटणार?

सोमवारी लोकसभा अध्यक्षांना हा गट आपल्या नव्या गटाची यादी सादर करणार आहे. दोन खासदार कमी पडत असल्याने आठ दिवस बंडखोरीचा आणि स्वतंत्र गटाचा निर्णय लांबणीवर पडत होता. कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतर मोहीम फत्ते झाल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here