Stamped in Bihar Temple : बिहारमध्ये श्रावणाला सुरुवात झाली असून इथे महिन्याच्या पहिल्याच सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. इथे मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले. मंदिरात अभिषेक करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याने हा सर्व प्रकार घडला.

 

stamped in bihar temple
बिहार, सिवान : बिहारमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. इथे बाबा महेंद्रनाथ शिव मंदिरात जलाभिषेकादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इथे श्रावणाला सुरुवात झाली असून आज पहिल्या सोमवारी ही भीषण घटना घडली आहे. या अपघातात आणखी काही भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. इतकंच नाहीतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये मुफसिल पोलीस ठाण्याच्या भंतापोखर येथील सोहगमती देवी आणि लीलावती देवी या अन्य महिलेचा समावेश आहे.

मोठी बातमी! भाजपच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला, भर रस्त्यात कार थांबवून धारदार शस्त्राने वार
या घटनेनंतर मंदिराचा बंदोबस्त सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. खरंतर, करोनाच्या काळात दोन वर्षे बंद राहिल्यानंतर पहिल्या सोमवारी मंदिरात जलाभिषेकासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. यावेळी ही घटना घडली आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : stamped in bihar baba mahendranath shiv mandir temple two women died many injured
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here