Deepali Masirkar : राष्ट्रपती निवडणुकीच्या निरीक्षणासाठी मराठमोळ्या आयपीएस दिपाली मासीरकरची नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्तानं चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

हायलाइट्स:
- राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान
- यशवंत सिन्हा द्रौपदी मुर्मू आमने सामने
- दीपाली मासीरकर निवडणूक निरीक्षकपदी
भाजपच्या नेतृत्त्वातील रालोआनं द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर, विरोधी पक्षांनी संयुक्तपणे यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. दीपाली मासीरकर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाच वर्षासाठी भारत निवडणूक आयोगात संचालक म्हणून दिपाली मासीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठमोळ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला राष्ट्रपती निवडणुकीत आपले कर्तव्य बजावण्याची संधी मिळाली ही अभिमानाची बाब असल्याच्या भावना चंद्रपूरच्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
सत्तापालट होताच घराचं भाडं वाढवलं, राष्ट्रवादीचा आमदार भाजप नेत्याचं घर सोडणार
मासीरकर यांनी यापूर्वी मुंबई येथे सहाय्यक महानिरीक्षक या पदावर कार्य केले. नागपूर येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी देखील त्यांनी काम केलं आहे. भारत निवडणूक आयोगात संचालक पदी नियुक्ती पूर्वी नागालँडमधील कोहिमा येथे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून त्या कार्यरत होत्या. भारत निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आता त्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
आजपासून महागाईत भर! सामान्यांचे घरखर्चाचे गणित बिघडणार, ‘या’ वस्तू महागणार
द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात लढत
भाजपच्या नेतृत्त्वातील रालोआनं द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर, विरोधी पक्षांनी संयुक्तपणे यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षांनी संयुक्तपणे यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. आज होणाऱ्या निवडणुकीत भारतातील खासदार आणि आमदार मिळून ४८०० मतदार मतदान करतील. आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २१ जुलै रोजी मतमोजणी पार पडणार आहे. नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलै रोजी होईल. विविध प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यामुळे मुर्मू यांना एकूण १० लाख ८६ हजार ४३१ मतांपैकी तब्बल ६ लाख ६७ हजार मते मिळण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याच्या तयारीत; १५ ते २० आमदार फुटणार?
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network