Shivsena Ratnagiri news | काही दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून रत्नागिरीतील आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांची हकालपट्टी करण्यात आली होती. उदय सामंत यांचे समर्थक असणारे उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेटये आणि युवा तालुका अधिकारी तुषार साळवी यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरीत नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेनेने शहर संघटक आणि महिला संघटक या पदांचीही नव्याने नियुक्ती केली होती

 

Uddhav Thackeray still (1)
उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांची हकालपट्टी करण्यात आली होती
  • बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती
  • उपजिल्हाप्रमुख पदाचा कारभार स्वीकारण्यास नकार
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अद्याप काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्हे, तालुका आणि महानगरपालिकांमधील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी वेगाने शिंदे गटात दाखल होत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडूनही (Shivsena) आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील होणाऱ्या बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून तातडीने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोकणात नव्याने नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांनीही अवघ्या काही तासांत राजीनामे दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
उद्धव ठाकरेंच्या हातातून खासदारही निसटणार; १४ जणांची यादी तयार; दिल्लीत आज मोठी घोषणा?
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून रत्नागिरीतील आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांची हकालपट्टी करण्यात आली होती. उदय सामंत यांचे समर्थक असणारे उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेटये आणि युवा तालुका अधिकारी तुषार साळवी यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरीत नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेनेने शहर संघटक आणि महिला संघटक या पदांचीही नव्याने नियुक्ती केली होती. मात्र, यापैकी प्रकाश रसाळ यांनी उपजिल्हाप्रमुख पदाचा कारभार स्वीकारण्यास नकार दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण हे पद स्वीकारू शकत नसल्याचे रसाळ यांनी म्हटले आहे. तर युवा संघटक वैभव पाटील यांनी नेमणूक झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये पदाचा राजीनामा दिला आहे. हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदे काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याच्या तयारीत; १५ ते २० आमदार फुटणार?
आघाडीचे २० नगरसेवक भाजपच्या संपर्कात

राज्यातील सत्तांतराचे पुणे महापालिका निवडणुकीतही पडसाद उमटू लागले असून महाविकास आघाडीतील माजी १८ ते २० नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाशी संपर्क साधला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळू शकते का, याची चाचपणी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपमधील जवळपास २० ते २२ नगरसेवक महाविकास आघाडीत जाण्याच्या तयारीत होते. मात्र, लांबलेल्या महापालिकेच्या निवडणुका आणि राज्यातील सत्तांतराचा भाजपला फायदा होत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shiv sena new office bearers also give resignation may join eknath shinde camp
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here