Presidential Election 2022 | भाजप पक्ष आपल्या कार्यकर्त्यांची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतो. आम्ही सगळ्यांना एकत्र जमायला सांगतो. जेणेकरून कोण आजारी आहे, मतदानाला येण्यात कोणाला अडचण आहे, हे लक्षात येते. मुंबईत आल्यानंतर भाजपच्या आमदारांना राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था असेल, याकडे आमचे लक्ष असते. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची चिंता करतो. काँग्रेस पक्षात तशी संस्कृती नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

हायलाइट्स:
- राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतील फोडाफोडीच्या पॅटर्नची पुनरावृत्ती
- विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपच्या बाजूने १६४ आमदारांनी मतदान केले होते
- भाजपचे नेते द्रौपदी मुर्मू यांना २०० पेक्षा अधिक आमदार मतदान करतील, असा दावा करत आहेत
यापूर्वी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपच्या बाजूने १६४ आमदारांनी मतदान केले होते. मात्र, भाजपचे नेते द्रौपदी मुर्मू यांना २०० पेक्षा अधिक आमदार मतदान करतील, असा दावा करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे १५ आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असे जाहीर केले होते. त्यामुळे ही मतं वगळली तरी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मविआची आणखी २१ मतं फुटतील, असा अंदाज आहे. त्यामुळे या निवडणुकीतही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतील फोडाफोडीच्या पॅटर्नची पुनरावृत्ती होईल, अशी चर्चा आहे.
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीप्रमाणे राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या मतदानासाठीही भाजपच्या आमदारांना बसनेच विधिमंडळात नेण्यात आले. यावरू काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला टोला हाणला. या निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही. ज्यांचे आमदार फुटणार आहेत, त्यांना बसने आणले जात आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले. नाना पटोले यांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही तात्काळ प्रत्युत्तर दिले. काँग्रेसला आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घेता येत नाही. भाजप पक्ष आपल्या कार्यकर्त्यांची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतो. आम्ही सगळ्यांना एकत्र जमायला सांगतो. जेणेकरून कोण आजारी आहे, मतदानाला येण्यात कोणाला अडचण आहे, हे लक्षात येते. मुंबईत आल्यानंतर भाजपच्या आमदारांना राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था असेल, याकडे आमचे लक्ष असते. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची चिंता करतो. काँग्रेस पक्षात तशी संस्कृती नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : presidential election 2022 draupadi murmu vs yashwant sinha bjp will get 21 extra votes from mva says girish mahajan
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network