वर्धा : राज्यात मुसळधार पाऊस सुरू असताना वर्ध्यात मोठा पूर आला आहे. जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने पावसाची तीव्रता पाहता हा निर्णय घेतला आहे. या पुराचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

पुरामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद झाले आहेत. हिंगणघाट तालुक्यातील अलमडोह, मनसावली, सोनेगाव, कान्होली या गावांना पुराचा वेढा बसला आहे. तर देवळी, सेलू तालुक्यातीलाही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे अनेक नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

‘मी माझ्या घरात लपलोय’, जीव वाचवण्यासाठी पोलिसांना फोन; घटनास्थळ गाठताच बायको असं काही म्हणाली की…

मिळालेल्या माहितीनुसार, आर्वी तालुक्यातील सोरटा, पानवाडीसह काही गावात पाणी शिरलं आहे. या गावांना चाहूबाजूनी पुराने घेरलं आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना उंचीवर थांबणायचं आवाहन करण्यात आलं आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे गावाला संपूर्ण बाजूने पूर असल्याने बचावकार्यासाठी अडचण येत असल्याची माहिती आहे.

मोठी बातमी! भाजपच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला, भर रस्त्यात कार थांबवून धारदार शस्त्राने वार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here