Ajit Pawar Meets Eknath Shinde: अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सोमवारी राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री कार्यालयात एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफही होते. आता अजित पवार मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हायलाइट्स:
- शिंदे-फडणवीस सरकारने नगरविकास खात्यामधील ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती
- या विकासकामांसाठी मार्च ते जून २०२२ दरम्यान निधी मंजूर करण्यात आला होता
- ९४१ कोटींपैकी २४५ कोटींचे वितरण एकट्या बारामती नगरपरिषदेला झाले होते
अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सोमवारी राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री कार्यालयात एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफही होते. आता अजित पवार मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अजित पवार विकासकामांच्या निधीचा पुरवठा पुन्हा सुरळीत करणार का, हे पाहावे लागेल.
एकनाथ शिंदेंनी नेमका काय निर्णय घेतला?
शिंदे-फडणवीस सरकारने नगरविकास खात्यामधील ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती. या विकासकामांसाठी मार्च ते जून २०२२ दरम्यान निधी मंजूर करण्यात आला होता. या ९४१ कोटींपैकी २४५ कोटींचे वितरण एकट्या बारामती नगरपरिषदेला झाले होते. आता ही सर्व कामे स्थगित करण्यात आली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली असली तरी शिवसेना आमदारांनी शिफारस केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. आमदार पवार यांच्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारने कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर केले होते. ते काम रद्द करण्यात आले होते.
रोहित पवारांची विनंती
माझ्या मतदारसंघातील पक्षकारांची ‘तारीख पे तारीख’ या त्रासातून सुटका व्हावी आणि वकीलांचीही सोय व्हावी म्हणून गेली दोन-अडीच वर्षे पाठपुरावा करुन महाविकास आघाडीचे सरकार असताना मी कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर करुन आणले. पण या सरकारने सत्तेत येताच या निर्णयाला स्थगिती दिली. कदाचित, राज्य पातळीवरील मोठ्या निर्णयांना स्थगिती देताना तालुका पातळीवरील दिवाणी न्यायालयासारख्या छोट्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा निर्णय अनावधानाने झाला असावा. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, याबाबत आपण व्यक्तिशः लक्ष घालून या निर्णयावरील स्थगिती उठवावी.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : ncp leader ajit pawar meets cm eknath shinde after govt give stay urban development 941 crores project
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network