मुंबई : गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्या लग्नाला १६ जुलै रोजी एक वर्ष झालं. हल्ली बरेच सेलिब्रिटी लग्नाचा वाढदिवस साजरा करायला परदेशात जातात. तसा राहुल पत्नी दिशाबरोबर लंडनला पोहोचलाय. प्रवासाला निघताना राहुल-दिशा काही वेगळ्याच मूडमध्ये दिसले. दोघंही खूप खूश होते.

‘लेक माझी दुर्गा’मध्ये राजेश देशपांडेची एंट्री; ‘योगायोगा’ने या कलाकाराला केलं रिप्ले

लंडनच्या विमान प्रवासातच त्यांनी एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली. दोघं एकमेकांना मिठी मारत होते. एकमेकांचा किस घेत होते. त्यात त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. राहुलनं दिशाला टॅग करत या फोटोबरोबर आपलं प्रेम शब्दात व्यक्त केलं आहे.

राहुल वैद्य-दिशा परमार

राहुल वैद्यनं लिहिलं आहे, ‘लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खूप प्रेम माय लव्ह. एक वर्ष खूपच जलद गेलं. तू माझ्या आयुष्यात माझी जोडीदार असणं, हा माझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे. कोणाला काहीही वाटो, पण मला तूच पुढच्या सात जन्मात पत्नी म्हणून हवी आहेस. तुझ्या मनाच्या सौंदर्यानं माझा प्रत्येक दिवस उजळून निघतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपली पुढची अनेक वर्ष अशीच आनंदी आणि सोबत जाऊ देत.’

राहुलनं मनापासून लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राहुलप्रमाणे अभिनेत्री दिशा परमारही सोशल मीडियावर सक्रिय असते. तिची फॅशन स्टाइल खूपच जबरदस्त आहे. प्रत्येक जण तिच्या लूकची नेहमी तारीफ करताना दिसतो. दिशाकडे कपड्यांचे सुंदर कलेक्शन आहे. तिच्या या साध्या सिम्पल लूकला तुम्ही देखील फॉलो करु शकता.

उत्तम फोटोग्राफरही आहे हा मराठी अभिनेता; शेअर केला बांधवघर अभयारण्यातील

दिशाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया साइडवर काही फोट शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने लाल रंगाचे ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये दिशा अगदी परी प्रमाणे भासत आहे. तिचे हे फोटो पाहून एका युजर्रने ‘मार ही डालो’ अशी कमेंन्टसुद्धा केली आहे.

चित्रपटाचं नाटक होऊ द्यायचं नव्हतं; दिग्दर्शक प्रताप फड यांनी सांगितला ‘अनन्याचा’ प्रवास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here