मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात घडवलेल्या सत्तांतरानंतर गल्ली ते दिल्लीपर्यंत फक्त त्यांच्याच नावाची चर्चा आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी एका चिमुकलीशी गप्पा मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवणच्या विठ्ठलराव जोशी चॅरिटीज आणि ट्रस्ट इंग्लिस मीडियम स्कुल इथं ती शिकते. तिचा निरागस आणि गोड व्हिडिओ सध्या मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यावेळी बोलताना तिने मलाही मुख्यमंत्री होता येईल का असाही प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. यावर नक्की होता येईल, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. तर गुवाहाटीला जाण्याविषयी विचारलं असता नक्की आपण कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाऊ असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिमुकलीला सांगितलं.