amravati news today, Car Accident Today : इनोव्हा आणि दुचाकीची जोरदार धडक, भीषण अपघातात जागीच ६ जण ठार – car accident of innova and two wheeler 6 people died on the spot in amravati
अमरावती : अमरावतीमध्ये इनोव्हा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. शिरजगाव पोलीस स्टेशन येथील रात्रगस्त अंमलदार गस्त घालत असताना त्यांना रोडवरील पुलाजवळ मोटरसायकलची शीट पडलेली दिसली. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी थांबून पाहणी केली असता अपघात झाल्याचे दिसून आले. या भीषण अपघातामध्ये तब्बल ६ जणांचा मृत्यू झाल्याची महिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील जखमी आणि मृतक हे वाहनात फसलेले होते. त्यांना वाहनाबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर इथे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.